गांधी हवेच आणि गांधी नकोच असा टोकाचा विचार आज परत होणार आणि तो चालूच राहणार ..
पण कोणते गांधी हवेत आणि कोणते नकोत याचा विचार आपण सर्व पूर्वग्रह विसरून विवेकबुद्धिने करण्याची वेळ आली आहे .
गांधीना पकडून ठेवण्याने राष्ट्रीय जीवनाचा तेजोभंग आहे पण सोडण्याने नियंत्रित, संयमी, कठोर शिस्तपालन आणि स्वावलंबनाचे आदर्श जीवन यांना मुकणे आहे .दोन्ही पण घातकच.
अर्थात यासाठी आपल्या देशात दूसरे आदर्श नाहीत का ? भरपूर आहेत ..मग गांधीच् का ?
कारण गांधीं ही आजच्या घडिला न पुसली जाणारी काळाच्या पडद्यावर उमटलेली अमिट रेष आहे , हे सत्य नाकारता येत नाही .
एखाद्या व्यक्तीला ,विचाराला जितका विरोध होईल तितकाच त्या व्यक्ती/विचार यांच्या अनुयायाचा कट्टरपणा वाढतो .
तसाच गांधीवाद हा पण संपु शकत नाही म्हणून निष्फळ वादविवादातून पुढे जायच असेल तर काल सुसंगत गांधी स्वीकारणे हे अपरिहार्य आणि शहाणपणाचे ठरू शकते .
हिंसेच समर्थन कधीच होऊ शकत नाही पण म्हणून कोणी आत्यंतिक अहिंसेचा आग्रह राष्ट्रजीवनात धरत असेल तर तो ही चुकिचाच असतो हे इतिहास आणि काळाने सदैव अधोरेखित केल आहे .
The true virtue lies in the mean between two extremities .
गांधी क्रांतिकारी होते की सुधारणावादी ? गांधी स्वत: सांगतात की मी सुधारणावादी क्रांतिकारी आहे .
गांधी स्वत: सांगत की मी जे आज बोलतो ते प्रमाण मानु नका कारण मी प्रयोगशील आहे , कदाचित आजचा अनुभव मला उद्या काही वेगळे सांगण्यास सांगेल . ही गांधींच्या जीवनाची भूमिका लक्षात घ्यायला हवीच .
ज्याला सत्याची थोड़ी तरी चाड आहे तिथेच सत्याग्रह होऊ शकतो. पण कोणी सीमेवर जाऊन सत्याग्रह आणि उपोषण याचा जर अनाठाइ आग्रह करत असेल तर त्याला आत्महत्या म्हणावी लागेल .
गांधी विरोधक गांधीना सामजिक जीवनात शोधतात आणि गांधीवादी म्हणवून घेणारे कधीच गांधीच्या वैयक्तिक जीवनाचे दर्शन घडवत नाहीत.
आजच्या काळात हवे आहेत ते , वैयक्तिक जीवनात रोज अडखळलेले गांधी जे वेगवेगळे प्रयोग करत विकसित झाले .
स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक जाहिरात दिली होती " Wanted Reformers of themselves , not of others" या जाहिरातीचा शोध म्हणजे गांधी . यामुळेच विनोबा भावे , साने गुरूजी यांसारखे जे कदाचित गांधीपेक्षा अधिक विद्वान असतील त्यांनीदेखील गांधींच शिष्यत्व पत्करल .
अहिंसा हे गीतेतील तत्वज्ञान आहे पण ते गीतेच अंतिम तत्वज्ञान नाही .कारण कोणत्याही ग्रंथाचा सार हा त्याच्या उपक्रम आणि उपसंहार यावरून ठरतो .गीतेचा उपसंहार अहिंसा निश्चितच नाही .
गांधींनी स्पष्ट सांगितल आहे ज्यांना अहिंसा झेपत नाही त्यांनी हिंसेने स्वतः वर होणारी हिंसा रोखण्याचा प्रयास करावा .
"हिंसापि क्लैब्यात श्रेयसी "(षंढ बनण्यापेक्षा हिंसा श्रेय ठरते ) हे देखील गांधीचंच म्हणणे आहे .याचा गांधीवादी विचार करत नाहीत .या गांधींच्या म्हणण्याला गीतेचा आधार आहे " क्लैब्य मा स्म गम: पार्थ " ( हे अर्जुना , षंढ होऊ नकोस ). एकुणात प्रश्न हिंसा - अहिंसेचा नाही तर आपली भूमिका आपल्याला षंढ तर बनवत नाही ना याचा आहे .
हिंसा- अहिंसा हा प्रश्न, दुराग्रह नसेल आणि विवेक असेल तर त्यावर चर्वित चर्वण करण्याची आवश्यकता उरत नाही .
अहिंसा ही गांधींची भूमिका आहे पण त्यातुन जर क्लैब्य येत असेल तर ते त्यांना देखील मान्य नाही .अहिंसा ही गांधींची वैयक्तिक ताकद होती म्हणून ती त्यांच्या अनुयायांची असू शकत नाही .कारण अनुयायी फ़क्त शब्द उचलतात पण त्याचा मंत्र गांधींकडे होता .त्या मंत्राच्या उपासनेतुन गांधींचे महात्मा होऊ शकतात . बाबा आमटे यांनी गांधी - एक युगमुद्रा या मुक्त कवितेत गांधींचे यथार्थ वर्णन केले आहे .गांधींचा मंत्र नसेल तर गांधींचे विचार विकृती ठरू शकतात .
" तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो
हिंसक क्रांतिकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते.."
मेरा जीवन हि मेरा संदेश हे म्हणण्याचे धाडस गांधी करू शकतात कारण हा नंगा फकीर माणसाला भेडसावणाऱ्या आदिम समस्यांशी जाऊन बेधडक धडकला . मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा प्रयत्न गांधींनीहि केला आणि या प्रयत्नात स्वतःचा बुरखा त्यांनी फाडून घेतला. जे कबुल करायला आपण घाबरतो ते त्यांनी जगजाहीर केले . हि हिम्मत म्हणजे गांधी .
Be the change you want to see - हि गांधींची खरी विरासत .
Cleanliness is next to Godliness हि गांधींची साधना .
When doubts haunt me, when disappointments stare me in the face, and I see not one ray of hope on the horizon, I turn to Bhagavad-Gita and find a verse to comfort me; and I immediately begin to smile in the midst of overwhelming sorrow. Those who meditate on the Gita will derive fresh joy and new meanings from it every day .
हे त्यांनी सर्व समस्येसाठी शोधलेला उपायमार्ग . गीतेतून काय उचललं यापेक्षा समस्यांपुर्तीसाठी गीता उचलली हे त्यांच्या जीवनाचे अनुकरण होऊ शकते .
आज डोळे उघडून पाहिले तर दिसेल कि वैयक्तिक चारित्राच्या जोरावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे आदर्श गांधी आहेत हे सत्य नाकारता येत नाही . विनोबा भावे , साने गुरुजी , बाबा आमटे , रवींद्र कोल्हे असे एक ना अनेक आहेत . मेळघाटात केलेलं रवींद्र कोल्हेंच कार्य यात गांधीच्या विचारांचा प्रभाव काय असतो हे जाणवते.
स्वच्छ भारत संकल्प हा गांधीवाद आहे . अजूनही मोठं मोठ्या MNC अथवा संस्थांमध्ये जेव्हा सुशिक्षित लोकांसाठी Washroom Etiquette ची पाटी लावली जाते तरी देखील ज्या सुशिक्षितांना , इतकं शिक्षण घेऊन मला का हे सांगतात हा प्रश्न सतावत नाही त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची कीव वाटावी असेच आहे .म्हणून अजून गांधीवाद हवा आहे अशा अडाणी शिक्षितांसाठी .
गांधींचं एकादश व्रत हे आज हि किती कठीण आणि आवश्यक आहे हे गांधीवादी म्हणून घेणारे देखील सांगत नाहीत. या व्रतात खरे भारतीय जीवनदर्शन आहे .
अनादी 'सत्य' हे तत्व घेऊन ज्या व्यक्तीने स्वताच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आज त्यांचेच छायाचित्र असलेलं चलन हे भ्रष्टाचाराच सगळ्यात मोठं माध्यम बनलं आहे . अर्थात भ्रष्टाचार हि मानसिक विकृती आहे पण गांधींनी पुरस्कृत केलेलं प्राचीन 'सत्य' तत्व हेच त्याच निवारण बनु शकत.
गांधीजींना नाकारणं अर्थात त्यांच्या आज नको असलेल्या विचारांना स्थिर होण्यास वाव देण्यासारखे आहे .म्हणून आज काळ सुसंगत गांधी समोर येणं हे आवश्यक बनत आहे .
गांधींच्या वैचारिक भूमिकेच्या अतिरेकाची मर्यादा विवेकी बुद्धिने ओळखणे यातच गांधीवादाचा विजय आहे .
स्वत:ची आत्मशुद्धि करुन समाजासमोर आदर्श उभे करणार सुधारणवादि गांधीतत्व हे सामाजिक क्रांतीची बीजे रोवू शकते .
-- सागर मुत्तगी